आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी 6 जण हिंदुत्त्ववादी संघटनांच्या निशाण्यावर..अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे आणखी 6 जण हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळेच्या डायरीतून सहा जणांची नावे समोर आली आहेत. त्यात चार जण ठाण्यातील, एक उत्तर प्रदेशातील आणि एका नावाचा उल्लेख मुंबई एसपी असा उल्लेख आहे.

 

'मुंबई एसपी' म्हणजे एसपी नंदकुमार नायर?  

सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, 'मुंबई एसपी' म्हणजे एसपी नंदकुमार नायर हे असू शकतात. यापूर्वीही ते हिंदुत्त्वादी संघटनेच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, नंदकुमार नायर यांनीच दाभोलकर हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडे याला पहिल्यांदा अटक केली होती. तेव्हापासूनच हिंदूत्त्ववादी संघटना नायर यांना टार्गेट करत आहे. अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे दाभोलकरांच्या हत्येमागील मास्टरमाइंड असल्याचा संशय सीबीआयला आहे.

 

दुसरीकडे, एटीएस बंगळुरू पोलिसांकडून अमोल काळेची कस्टडी घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. आवश्यकता भासल्यास सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवलेंची यांचीही चौकशी करण्‍यात येईल, असे एटीएसच्या सूत्रांनी म्हटले आहे.

 

कोण आहे अमोल काळे?
- अमोल काळे (48) हा पुण्यातील माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे.
- पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, वयोवृध्‍द आई
- अमोलच्या वडिलांचे पान टपरी होती. काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला.
- अमोल काळेचे डिप्लोमापर्यंतचे शिक्षण झाले आहे. ऑटो मोबाईल्स स्पेअर पार्टस पुरवण्याचा व्यवसाय तो करत होता.
- अमोर आधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही करत होता.

 

कोण आहे वीरेंद्र तावडे?
- डॉ.वीरेंद्र तावडे हे कान, नाक आणि घशाचे तज्‍ज्ञ आहे.
- पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो.
- 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे.

 

बातम्या आणखी आहेत...