आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI- भायखळा तुरुंगातील 50 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा; जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील भायखळा तुरुंगातील जवळपास 50 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

भायखळा तुरुंगातील 46 महिला कैद्यांची तब्येत आज (शुक्रवार) सकाळी अचानक बिघडली. महिला कैद्यांना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने जे जे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कैद्यांवर उपचार सुरु करण्‍यात आले असून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जेजेचे प्रभारी डिन डॉ. मुकूंद तायडे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...