आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; \'अलीबाबा\'च्या जॅक मा यांना टाकले मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्ल्ूमबर्ग बिलिनियर निर्देशांकानुसार शुक्रवारी अंबानी यांचे नेटवर्थ ४४.३ अब्ज डॉलर (३.०३ लाख कोटी रुपये) झाले आहे. जॅक मा यांचे नेटवर्थ ४४ अब्ज डॉलर (३.०१ लाख कोटी रुपये) चे आहे. जॅक मा यांची कंपनी अमेरिकी शेअर बाजारात लिस्टेड आहे. त्यामुळे त्यांच्या नेटवर्कची आकडेवारी गुरुवारच्या शेअरच्या भावावर आधारित आहे. मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर समूहाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे नेटवर्थ वाढण्यामागे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीचे सर्वात मोठे योगदान आहे. जानेवारी ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झालेली आहे. 


मुकेश अंबानी : नेटवर्थ ३.०३ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये २७,५०० कोटी रुपयांनी वाढली) 
जॅक मा : नेटवर्थ ३.०१ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये ९,५०० कोटी रुपयांनी घटली) 


मार्केट कॅप ७ लाख कोटींवर 
रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्केट कॅप शुक्रवारी पहिल्यांदा ७ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. दिवसभराच्या व्यवहारात हा ७,०१,४०४ कोटी रुपये (१०२ अब्ज डॉलर) पर्यंत पोहोचला. त्याच वेळी शेअरदेखील ११०७.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. व्यवहाराच्या शेवटी शेअर १०९६.७५ या पातळीवर बंद झाला, त्या वेळी मार्केट कॅप कमी होऊन ६,९४,९४४ कोटी रुपयांवर आला. गुरुवारीच कंपनीचा मार्केट कॅप १० वर्षात दुसऱ्यांदा १०० अब्ज डॉलरच्या वर गेला होता३, पहिल्यांदा १८ ऑक्टोबर २००७ रोजी कंपनी १०० अब्ज डॉलरची झाली होती. त्यावेळी एका डॉलरची किंमत ३९.५९ रुपये होती आज जी ६८.५३ रुपये आहे. 


शेअरमध्ये १३.५ %वाढ 
पाच जुलै रोजी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानी सांगितले होते की, २०२५ पर्यंत कंपनीचा आकार दुपटीने वाढणार आहे. त्यानंतर केवळ सहा सत्रांत रिलायन्सच्या शेअरमध्ये १३.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रोकिंग संस्था के. आर. चौकसेचे एमडी देवेन चौकसे यांनी सांगितले की, काही वर्षांत नफा दुपटीने वाढल्यास शेअरची किंमतही दुपटीने वाढणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...