आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात: मुंबईतील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी, बाईकवरून घसरताच डोक्यावरून गेले बसचे चाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील आर्थिक राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. या पावसामुळे महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. कल्याणमध्ये खड्ड्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. बाईक खड्ड्यात गेल्याने वाहन नियंत्रण झाले आणि मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. मागून आलेल्या भरधाव बसने तिला चिरडले. महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या भयावह घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनीषा भोईर असे मृत महिलेचे नाव आहे. ती नातेवाईकासोबत मार्केटमध्ये जात होती. मनीषा मागील सीटवर बसल्या होत्या. पाऊस सुरु असल्याने मनीषा यांच्या हातात छत्री होती. खड्ड्‍यामुळे गाडी घसरताच मनीषा रस्त्यावर पडल्या आणि मागून आलेल्या भरधाव बसचे मागील चाक मनीषा यांच्या डोक्यावरून गेले.

ही घटना7 जुलै रोजी कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे.
 
पाहा या भीषण अपघाताचा व्हिडिओ... (ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात)

 

बातम्या आणखी आहेत...