आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • खेळता खेळता चिमुरडीने गिळली आईची ईअररिंग; फसली होती गळ्यात Mumbai Doctors Remove 2 Inch Earring From Infant’S Windpipe

खेळता-खेळता चिमुरडीने गिळली आईची 8 इंजाची ईअररिंग; फसली होती गळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एक वर्षीय चिमुरडीने खेळता खेळता आईची ईअररिंग गिळली. तब्बल 8 दिवस ईअररिंग चिमुरडीच्या गळ्यात फसली होती. चिमुरडीची तब्बेत बिघडल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले.


एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले थक्क..

मुलीच्या विंडपाइपमध्ये ईअररिंग अडकले होते. नंतर मुलीला श्वास घेताना त्रास होत होता. तिच्या गळ्यात इंफेक्शन झाले होते. मुलीची तब्बेत बिघडल्यानंतर तिला टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले. मुलीच्या गळ्याचा एक्स-रे पाहून डॉक्टरही थक्क झाले. मुलीच्या गळ्यात आठ इंचाचे ईअररिंग अडकले होते.

 

मुलीची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. लाइफ सपोर्ट सिस्टिमवर तीन दिवस ठेवल्यानंतर मुलीला वाडिया हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले . एक्स-रे काढल्यानंतर मुलीच्या गळ्यात ईअररिंग अडकल्याचे स्पष्ट झाले.

 

ब्रोंकोस्कोपीने काढले ईअररिंग...

डॉक्टरांनी सर्जरी न करता ब्रोंकोस्कोपीच्या माध्यमातून गळ्यात अडकलेले  ईअररिंग काढले. मुलीची प्रकृती स्थीर झाल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...