आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HIGH TIDE: मुंबईकरांनो सावधान! समुद्रात उसळणार उंचच उंच लाटा..अतिवृष्टीचाही इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईकरानो सावधान! हवामान विभागाने रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोबतच मुंबईच्या समुद्रात 5 मीटरपेक्षाही उंच लाटा उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर सागरी किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. दरम्यान, काल भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्रातून सुमारे 9 मॅट्रिक टन कचरा बाहेर आला होता. बाणगंगा परिसरातील सागर नगरातील घरांमध्ये समुद्राच्या पाण्यासह कचराही आला होता. हा कचरा उचलताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते.

 

दुपारी 2 वाजेच्या सुमारास येणार भरती...  
मुंबईतील समुद्रांत रविवारी 1 वाजून 39 मिनिटांनी भरती येणार आहे. सर्वाधिक उंचीच्या म्हणजे 4.96 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच  सोमवारीही दुपारी 2 वाजून 37 मिनिटांनी 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. यादरम्यान मुंबईसह कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... बाणगंगा परिसरातील घरांमध्ये समुद्राच्या पाण्यासोबत अाला मोठ्या प्रमाणात कचरा..

बातम्या आणखी आहेत...