आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • डीएसके पुत्र शिरीष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला Mumbai High Court Rejected To Dsks Son Shirish Kulkarnis Anticipatory Bail

DSK पुत्र शिरीष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. मुंबई हायकोर्टाने शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, शिरीष कुलकर्णी यांना 18 जूनपर्यंत अटकेपासून हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

 

तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्याचे निर्देश...

शिरीष कुलकर्णी यांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला 'डीएसके' ब्रँडपासून वेगळे समजू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, अशा शब्दात न्यायमूर्ती साधना जाधव यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच शिरीष कुलकर्णी यांना 10 दिवस दररोज तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

 

लोकांचा पैसा गैरमार्गाने आपल्या कुटुंबियांच्या नावे वळवणे...
सुमारे 2 हजार 43 कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. लोकांचा पैसा गैरमार्गाने आपल्या कुटुंबियांच्या नावे वळवणे, ही या संपूर्ण घोटाळ्याची कार्यपद्धती होती, असे निरीक्षण हायकोर्टाने यावेळी नोंदवले.

 

तन्वी कुलकर्णी यांचाही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तन्वी कुलकर्णी यांनीही पुणे सेशन कोर्टाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

 

आतापर्यंत सात जणांना अटक..

ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना अटक झाली आहे. यात मुख्यत्वे त्यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...