आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्माकोलच्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार; व्यावसायिकांची याचिका फेटाळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यंदाचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली साजरा होणार आहे. कारण, सरकारने प्लास्टिकसाेबत लागू केलेली थर्माकोल वापरावरील बंदी शिथिल करण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला आहे. गणेशोत्सवात थर्माकोलची आरास करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला. बंदी जाहीर होण्यापूर्वी यंदाच्या गणेशोत्सवासाठी लागणारी थर्माकोलची मखरे आणि आरास यांचे उत्पादन झाल्याने किमान यंदा या बंदीतून थर्माकोलच्या सजावटीला सूट द्यावी, अशी मागणी व्यावसायिक संघटनेने केली होती. 


पर्यावरण विभागाने २३ मार्च रोजी प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २३ जूनपासून राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री, साठा, वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. या निर्णयाविरोधात थर्माकोलपासून सजावटीच्या वस्तू बनवणाऱ्यांच्या संघटनेने हायकोर्टात धाव घेतली होती. 


'पर्यावरणाकडे दुर्लक्ष नकाेच' 
२३ जूनची मुदत असतानाही उत्पादकांनी थर्माकोल नष्ट केले नाही. यामुळे त्यांना सवलत देणे योग्य नसल्याचा युक्तिवाद सरकारने केला. हायकोर्टाने तो ग्राह्य धरला. तसेच प्लास्टिक वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी शरीराला निर्माण होत असलेला धोका दुर्लक्षित करता येणार नाही, असे मतही हायकोर्टाने नोंदवले. 

बातम्या आणखी आहेत...