आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Updates: मुंबईत पावसाची विश्रांती: डोंबिवलीत नाल्याच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईला सलग चार दिवस पावसाने झोडपल्यानंतर बुधवारी पहाटेपासून पावसाची विश्रांती घेतली आहे. मात्र, येत्या शनिवारपर्यंत (ता.14) मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे, डोंबिवलीत नाल्याच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तरुणांच्या शोधासाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागाती नाल्यात मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक जण नाल्यात वाहून गेला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्राने नाल्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोही नाल्यात वाहून गेला.

केडीएमसीच्या अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता तरुणांचा शोध सुरु आहे.

 

मुसळधार पावसामुळे नालासोपारासह परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे स्टेशनला नदीची रुप प्राप्त झाले आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नालासोपारा येथील फोटो...

बातम्या आणखी आहेत...