आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cost of Living Survey 2018: देशात सर्वात महागडे शहर मुंबई तर जागतिक क्रमवारीत हाँगकाँग टॉपवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- उज्बेकिस्तानातील ताशकंद हे जगभरातील सर्वात स्वस्त शहर

- पाकिस्तानची राजधानी कराची 205 व्या क्रमांकावर

 

मुंबई- 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग'मध्ये देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई हे सर्वात महागडे शहर ठरले आहे. इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सरचा 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे-2018 समोर आला आहे. त्यात देशातील मुंबईसह 6 शहरांचा समावेश करण्‍यात आला आहे.

 

महागड्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत मुंबई 55 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न (58 वा क्रमांक) आणि यूरोपमधील फ्रेंकफर्ट (68 वा क्रमांक) सारख्या शहरांच्या तुलनेत मुंबई प्रचंड महागडे शहर आहे  तर जागतिक क्रमवारीत हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर ठरले आहे.

 

दुसरीकडे, स्वस्त शहरांच्या जागतिक क्रमवारीत देशातील कोलकाता शहर (182 वा क्रमांक) आहे.

 

भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर सर्वात जास्त..
न्यूयॉर्कला मूळ शहर गृहीत धरू जगभरातील 209 शहरांमध्ये सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक शहरातील 200 वस्तुंच्या दरांची तुलना करून त्या आधारावर क्रमवारी ठरविण्यात आली. सर्व्हे समावेश करण्‍यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर (5.57%) सर्वात जास्त दिसून आला.

 

सर्व्हेनुसार लोणी, मीठ, चिकनसह मद्याचे दर जास्त असल्याने कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये वाढ झाली आहे. स्पोर्ट्स आणि मनोरंजनाची साधनेही महाग असल्याने त्याचा या शहरांच्या क्रमवारीवर परिणाम झाला आहे. तिसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ट्रान्सस्पोर्टेशन. त्यात टॅक्सीचे भाडे, वाहन नोंदणी तसेच रोड टॅक्सचा समावेश आहे.

 

जगातील 5 सर्वात महागडे शहरे

शहर जागतिक क्रमवारी
हाँगकाँग (चीन) 1
टोकियो (जापान) 2
ज्यूरिख (स्वित्झर्लंड) 3
सिंगापूर (मलेशिया) 4
सियोल (दक्षिण को‍रिया) 5

 

सर्व्हेत समावेश करण्‍यात आलेली भारतीय शहरे

शहर ग्लोबल रैंकिंग
मुंबई 55
दिल्ली 103
चेन्नई 144
बंगळुरु 170
कोलकाता 182

 

बातम्या आणखी आहेत...