आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलचा निर्णय 9 आठवड्यांत; सरकारकडून हायकोर्टात माहिती Mumbai Pune Express Highway Toll Issue

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल बंदीचा निर्णय 9 आठवड्यांत; सरकारकडून हायकोर्टात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या प्रकल्पावर करण्यात आलेला खर्च संबंधित कंत्राटदारांनी टोलच्या माध्यमातून आधीच वसूल केला आहे. तरीसुद्धा या मार्गावर टोलची वसुली सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टात राज्य सरकारला योग्य पाऊल उचलण्याचे निर्देश जारी केले होते.

 

त्यावर आगामी 9 आठवड्यांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गावर टोलवसुली करावी की नको, याबाबतचा अहवाल राज्य रस्ते विकास मंडळाकडून (एमएसआरडीसी) प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच निर्णय घेऊ, असे राज्य सरकारने न्या. ए. एस ओका आणि रियाझ चागला यांच्या पीठासमोर सोमवारी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...