आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना पावसाचा फटका; हातात बूट घेऊन गुडघाभर पाण्यातून काढली वाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईचा पाऊस भल्याभल्यांना जमिनीवर आणतो असे म्हणतात. त्याचे ताजे उदाहरण मंगळवारी पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा मंगळवारी मुंबईत बैठकांसाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी संवादही साधणार होते. मात्र, मुंबईवर पावसाने प्रचंड कृपा केल्याने त्यांना पत्रकार परिषद रद्द करावी लागली.

 

भाजप कार्यालयाबाहेर आल्यानंतर त्यांना मुंबईच्या पावसाचा अनुभव आला आणि हातात बूट घेऊन गुडघाभर पाण्यातून वाट काढत त्यांना जावे लागले. याबाबत माहिती देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले, संबित पात्रा काही बैठकांसाठी दादर कार्यालयात आले आहेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलणार होते. आमच्या बैठका झाल्या, परंतु पाऊस असल्याने आम्ही पत्रकार परिषद रद्द केली. दादर कार्यालयातून खाली आल्यानंतर आम्ही पाहिले तर गुडघाभर पाणी साठले होते. पात्रा यांना दिल्लीला जायचे असल्याने त्या पाण्यातून वाट काढत आम्ही निघालो, असेही केशव उपाध्ये यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...