आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुंबईकरांसाठी पुढील चार दिवस टेन्शनचे.. 24 तासांत 231 मिमी पाऊस, एक वाहून गेला Mumbai Rain LATEST UPDATES: 231 MM Rain In 24 Hours; Traffic And Trains Severely Affected

वडाळ्यात ३२ मजली इमारतीला तडे, २४० कुटुंबीयांना इतरत्र हलविण्याची तयारी; १५ चारचाकी वाहनांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शनिवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दक्षिण मुंबईतल्या वडाळा येथील 'लाॅइड इस्टेट' या ३२ मजली इमारतीला तडे गेले. पार्किंग भागातील संरक्षण भिंत साेमवारी पहाटे खचली. त्याच्या ढिगाऱ्याखाली १५ वाहने अडकली आहेत. भिंत खचल्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना तातडीने घरे खाली करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने दिल्या अाहेत. 


या दुर्घटनेत काेणतीही जीवितहानी झालेली नसली तर बेघर हाेण्याच्या भीतीने रहिवाशांत भीती निर्माण झाली अाहे. या प्रकरणी दाेस्ती बिल्डरच्या तीन बांधकाम ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. अँटाॅप हिल विभागात लाॅइड इस्टेट ही इमारत २० वर्षांपूर्वी बांधण्यात अाली असून या ३२ मजली इमारतीत एकूण ५ विंग अाहेत. यात २४० कुटुंबे राहतात. लाॅइड इस्टेट इमारतीच्या समाेरच दाेस्ती बिल्डरच्या एका नवीन इमारतीसाठी पाया खणण्याचे काम सुरू हाेते. मुसळधार पावसामुळे साेमवारी पहाटे ४ वाजता नव्या इमारतीच्या बाजूचा रस्ता खचला. त्याचबराेबर संरक्षक भिंतही खचली. 


या इमारतीच्या भिंतीला लागूनच झाेपड्या असल्याने ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत अाहे. भिंत काेसळल्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या पंधरा गाड्या मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसून ही वाहने बाहेर काढली. इमारतीसाठी बांधण्यासाठी खाेदण्यात अालेल्या माेठ्या खड्ड्यामुळेच संरक्षक भिंत काेसळल्याचा अाराेप रहिवाशांनी केला अाहे. 


दीड वर्षापूर्वी तक्रार, काहीच कारवाई नाही 
नव्या इमारतीच्या खाेदकामामुळे जलवाहिनी, गॅस वाहिनीला धक्का बसत असल्यामुळे इमारतीचे बांधकाम थांबण्यात यावे, अशी तक्रार लाॅइड इस्टेटच्या रहिवाशांनी दीड वर्षापूर्वीच पालिकेला केली हाेती. पण, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा दावा अाहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच व्हायब्रेटर नियमांचा उल्लंघन करणाऱ्या दोस्ती बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम व खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. 


इमारत खाली करण्याचे आदेश 
इमारतीला धाेका असल्याने पालिकेने रहिवाशांना ती खाली करण्याचे आदेश दिले आहे. परंतु अचानक आलेल्या या अादेशामुळे अाता राहायला जायचे कुठे, या विचाराने इमारतीमधील २४० कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. 


निष्काळजी पालिका अधिकाऱ्यांची चौकशी 
निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दाेस्ती बिल्डरचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गराेडिया, किसन गराेडिया, राजेश शहा या बांधकामदारांवर अँटाॅप हिल पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. इमारतीला तडे गेल्याने दाेस्ती बिल्डरला नवीन बांधकाम थांबवण्याची नाेटीस बजावली अाहे. पालिका अधिकाऱ्यांचीही चाैकशी होईल. या कामामुळे एका बाजूला पाण्याचा प्रवाह वाढल्याने माती खचली, असे अतिरिक्त अायुक्त विजय सिंघल म्हणाले. 

 

युवक वाहून गेला..
मालाडला एव्हरशाईन नाल्यात दुपारी साडेबारा वाजता १८ वर्षाचा युवक वाहून गेला आहे. चेंबुर आणि माटुंग्यातील काही सोसायटींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या, शहर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल आणि तटरक्षक दल यांना सतर्कतेचे निर्देश होते.

 

मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पालिकेचे 633 अधिकारी आणि 4 हजार 670 कर्मचारी रस्त्यावर तैनात होते. सात उदंचन केंद्रातील 22 पंप समुद्रात पाणी टाकण्यासाठी कार्यरत होते. सकाळी 11 वाजता वरुणराजाने विश्रांती घेतली. दुपारी पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांनी घरची लवकर वाट पकडली. परिणामी मध्य रेल्वेवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून फोटोमधून पाहा... मुंबईतील सद्याची स्थिती

बातम्या आणखी आहेत...