आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Mumbai Rain: मुंबईकरांनो कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह उपनगरात आज (मंगळवार) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. डोंबिवली, ठाणे, सायन, दादर परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिरानी धावत आहेत. त्यात अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने विरारकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. चाकरमान्यांची ऑफिसला जाण्याची वेळ आणि त्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे.

 

घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरु नका...

कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका, असा इशारा मुंबईकरांना देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर त्याचा निश्चितपणे फटका मुंबईच्या लाईफलाईनला बसू शकतो. जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत 795.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...