Home | Maharashtra | Mumbai | Murder in Bhivandi mumbai Crime latest News

होणार्‍या पत्नीला लाजाळू समजण्याची चूक करत होता तरुण, तिनं रात्री बोलवून केले हे कृत्य!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2018, 07:08 PM IST

लग्न ठरलेला मुलगा पसंत नाही म्हणून एका तरुणीने त्याला चॉकलेटमधून विष दिले.

  • Murder in Bhivandi mumbai Crime latest News

    मुंबई- लग्न ठरलेला मुलगा पसंत नाही म्हणून एका तरुणीने त्याला चॉकलेटमधून विष दिले. उपचारापूर्वीच भावी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    भिवंडी शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग परिसरात रहाणाऱ्या समरीन अली अन्सारी हिच्याशी लग्न ठरले होते. मात्र, समरीन हिला अरकम हा पसंत नव्हता. ती त्याला वारंवार टाळत होती. समरीन हीने अरकम याला फोन करून सांगितले की, मेरे जिंदगी से चले जाओ, मैने दिया हुआ जहर खाओगे? असे म्हटले होते. समरीनने अरकम याला भेटण्यास बोलवून त्याला विष लावलेले चॉकलेट खाण्यास दिले. चॉकलेट खाल्ल्यानंतर अरकमची प्रकृती बिघडली. त्याच्या नाका-तोंडातून फेस येत होता. त्याला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    समरीनला पोलिसांनी केली अटक
    अरकमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल समरीनला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अरकमच्या नातेवाईकांनी पोलिसांना अरकम आणि समरीन यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप दिली आहे.

Trending