आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • पुण्यात मित्रांनीच रचला मित्राच्या हत्याचा कट; गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड Murder In Pune Shoot By Friends

पुण्यात मित्रांनीच रचला मित्राच्या हत्याचा कट, गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरात बनाव करून हत्या केल्याची दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये पतीनेच प्रेम प्रकरणात कट रचून पत्नी आणि आठ महिन्याच्या मुलाची हत्या केल्याची  घटना ताजी असतानाच दुसरी घटना उजेडात आली आहे. 

 

पुण्याच्या मावळ परिसरातील कामशेत येथे हॉटेल राजवाडामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड झाले आहे. रविवारच्या (ता. 10) रात्री 9 वाजता वाजता ही घटना घडली. या घटनेला युवकाच्या मित्रांनीच अंजाम दिला आहे. निहाल नानेकर अस मृत युवकाचा नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमाराला निहाल आपल्या दोन मित्र संकेत सातनकर आणि विकी घोलप समवेत मुंबई पुणे महामार्गावरी हॉटेल राजवाडा येथे जेवणासाठी आला होता. निहाल हा त्याचा मित्र आकाश लांडगेच्या मृत्यूने डिप्रेशनमध्ये होता. आकाश पंजे नामक युवकाची दोन आढवढ्यापुर्वी चिंचवड येथे हत्या करण्यात आली होती. निहाल हा देखील आकाश लांडगेच्या टोळीमधील त्याचा साथीदार होता. आकाशच्या मृत्यू झाल्याने निहालला धक्का लागला होता. हॉटेलमध्ये बसलेले असताना निहालला आकाशच्या नातेवाईकांचा फोन आला असता त्याच्या तेराव्याचा विधी असल्याची माहिती मिळाली, आणि निहाल अजून डिप्रेशनमध्ये गेला होता. तितक्यात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि परिसरात खळबळ उडाली. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी बघितले असता निहाल राजाच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. निहालच्या मित्र विकी आणि संकेत यांनी निहाल ने स्वतःवर गोळी झाडल्याच नागरिकांना सांगितले. निहालला उपचारासाठी रुग्णालयात नेट असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी तापसात निहालला लागलेली गोळी पाहता, विकी आणि संकेतने हा बनाव रचल्याचे तपासात समोर आले. म्हणूनच कामशेत पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप दोघांना अटक केली नसून कामशेत पोलिस घतेचा सळोल तपास करीत आहेत.

 

पुढील स्लाइडवर वाचा..निहालचे वडील चालवतात रिक्षा...

 

बातम्या आणखी आहेत...