आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसंमेलनस्थळी राजकीय नेत्यांचे शक्तिप्रदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलुंड- ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाजवळील  रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या कमानींवर,  स्थानिक नेत्यांच्या प्रतिमा व नाट्यसंकुलाबाहेर विविध पक्षीय नेत्यांच्या  फ्लेक्सबाजीमधून पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे संमेलन म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचेच चित्र जणू निर्माण झाले आहे.   


यंदा नाट्यसंमेलनाच्या पत्रिकेत माजी पदाधिकाऱ्यांना डावलून राजकीय जंत्रीच अधिक दिसली. त्यावर नाट्य परिषदेच्या माजी पदाधिकारी लता नार्वेकर यांनी आक्षेप घेत हे संमेलन म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी आहे, अशा शब्दांत मध्यवर्ती नाट्य परिषदेवर टीका केली आहे. या संमेलनावर बहिष्कार टाकण्याचेही त्यांनी सूतोवाच केले आहे.  या राजकीय पक्षांच्या फ्लेक्सबाजीमधून त्यांच्या म्हणण्याला काही अंशी दुजोरा मिळत आहे.      


कोणत्याही कार्यक्रमाला  किंवा संमेलनाला राजकीय पुढाऱ्याला बोलावण्याची परंपरा तशी नवीन नाही, पण यंदा केवळ एकच राजकीय उद््घाटक न बोलावता दुसऱ्याही पक्षाच्या नेत्याला बोलावण्याचा घाट घालण्यात आल्याने राजकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे या संमलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. 

 

 हे हि वाचा, नाटक करून पोट भरा, तारखा विकून कसली पोटं भरता?

 

 

 

बातम्या आणखी आहेत...