आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात; गोध्रा हत्याकांड झाले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते शरद पवार Sharad Pawar Attack On PM Narendra Modi Over Constitution

नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात; गोध्रा हत्याकांड झाले तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते- पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'संविधान वाचवा, देश वाचवा' या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. नरेंद्र मोदींमुळे देशाचे संविधान धोक्यात आले असल्याचे खळबळजनक वक्तव्य अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

 

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, गोध्रा हत्याकांड झाले त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाल्याचे चित्र गोध्रा हत्याकांडमध्ये दिसले होते.

 

मोदींनाही जनताच धडा शिकवेल- पवार

इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप कामे केली होती, पण त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशातील जनतेने इंदिरा गांधीसारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. त्यामुळे नरेंद्र मोदींनाही देशातील जनता धडा शिकवेल, असेही पवारांनी यावेळी सांगितले.

 

भाजपकडून देशाच्या संविधानाबाबत कितीही चांगली वक्तव्ये होत असली तरी ती धादांत खोटी असल्याची टीका पवारांनी केली. माधव गोळवरकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत एका पुस्तकाच्या माध्यमातून टीका केली होती. त्यांच्याच विचारांवर चालणारा भाजप पक्ष असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...