आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण NCP MLA Jitendra Avhad Meet To Raj Thackeray In Mumbai

जितेंद्र आव्हाड \'कृष्णकुंज\'वर, राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रयत्नशील असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोरदार उधाण आले आहे. मात्र, व्यक्तिगत कामासाठी आपण राज ठाकरेंची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 


या भेटीदरम्यान दोघांत तब्बल दोन तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, ही भेट आपल्या व्यक्तिगत कामासाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. राज ठाकरे यांचा व्यासंग, विविध विषयांचा अभ्यास आणि सामाजिक जाण कौतुकास्पद आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या याच गुणांचा पुनर्प्रत्यय आल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज यांनी आव्हाडांशी राजकीय सद्य:स्थितीवर गप्पा मारल्या. तसेच राज यांनी आव्हाड यांना एखाद्या सामाजिक विषयावर भाष्य करताना टोकाची मांडणी न करता नियंत्रणात्मक मांडणी करण्याबाबत काही मैत्रीपूर्ण सल्लेही दिल्याचे समजते. 


पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या असून आतापासूनच राजकीय वातावरण तापत आहे. बदलत्या राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन भाजपने आपल्या मित्रपक्षांना चुचकारण्याचे धोरण अवलंबले असून केंद्रीय स्तरावर विरोधी पक्षांनीही भाजपविरोधी आघाडीच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...