आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्मा कँटीनच्या धर्तीवर महाराष्‍ट्रात राष्ट्रवादी सुरु करणार \'ताई कँटीन\', 6 रुपयांत मिळेल जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तमिळनाडू येथील अम्मा कँटीन, आंध्रप्रदेशमधील अण्णा कँटीन आणि राजधानी दिल्लीतील आम आदमी कँटीनच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात ताई कँटीन सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कॅंटीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नावाने सुरु करण्‍यात ये णार आहे. सुप्रिया यांना लोक 'ताई' असे संबोधित करतात.

 

राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पहिल्या 'ताई कॅं‍टीन'चे उद्धाघटन करण्‍यात येणार आहे. राष्‍ट्रवादीचे नगरसेवक आशीष दामले हे पहिली कॅंटीन सुरु करणार आहे. कॅंटीमध्ये अवघ्या सहा रुपयांत जेवण मिळणार आहे.

 

आर्थिक दुर्बल महिलांना कॅंटीनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा मूळ उद्देश आहे. तसेच सामान्य व्यक्तीला स्वस्त‍ दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवड्याचे सातही दिवस कॅंटीन सुरु राहील. कॅंटीन लोकवर्गणीतून सुरु करण्‍यात येत आहे. वर्गणीच्या रुपात पैसे न घेता तेल, गहू, डाळ, भाज्या घेण्‍यात येतील, असे आशीष दामले यांनी सांगितले.

 

बदलापूर येथे सुरु झाल्यनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ताई कॅंटीनच्या शाखा सुरु करण्यात येईल, असा मानसह आशीर दामले यांनी व्यक्त केला आहे.

 

शिवसेनेने यापूर्वी सुरु केले होते झुणका भाकर केंद्र...
महाराष्ट्रात कॅंटीनवरून राजकारण शिवसेनेने सुरु केले होते. 1995 मध्ये शिवसेनेने युती सरकारच्या काळात 'झुणका भाकर केंद्र' सुरु केले होते. अवघ्या एका रुपयांत झुणका भाकर उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कालांतराने ही योजना वादाच्या भोवर्‍यात अडकली. नंतर तर अनेक बनावट नावे समोर आली होती. त्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...