आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI: कांदिवलीमध्ये आठव्या मजल्यावरुन उडी मारुन नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजधानी मुंबईतील कांदिवली भगाताील ‘ठाकूर व्हिला’ या बहुमजली इमारतीत राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीने आठव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. हृषिका धीरेंद्र मायावशी असे मृत मुलीचे नाव आहे. 


दरम्यान, ही मुलगी इमारतीवरून उडी घेत असताना इमारतीच्या अन्य भागात राहणारे तसेच खाली उभे असलेल्या अनेकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठव्या मजल्याच्या खिडकीबाहेर उडी मारण्यासाठी उभी असलेल्या हृषिकाने कुणाचेही ऐकले नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. कांदिवली भागात ठाकूर व्हिला इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मृत हृषिका आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 


गुरुवारी सायंकाळी हृषिका मायावशीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिस सध्या मृत मुलीच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करत आहेत. तसेच तिचे मित्र आणि कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...