आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदी, विजय माल्ल्यांसह तब्बल 184 जणांनी लुटल्या देशातील बॅंका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या कार्यालयांवर सीबीआयची छापेमारी सुरु आहे. अटकेच्या भीतीने नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी आधीच भारतातून पलायन केले आहे. याआधी मद्यसम्राट विजय माल्ल्या यांनी बॅंकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.

 

देशातील बॅंकांना चूना लावणारे विजय माल्ल्या आणि नीरव मोदी हे दोघेच अपवाद नाहीत तर आणखी 184 जणांनी देशातील बॅंकांना लुटून विदेशात पलायन केले आहे, माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकहून मिळालेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सर्वाधिक 9 हजार 835 कोटी रुपयांची फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले होते.

 

पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते  जितेंद्र घाडगे यांनी मुंबई पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. यातून 184 जणांनी देशातील बॅंकांना कोट्यवधी रुपयांना  चुना लावून विदेशात पलायन केल्याचे समोर आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... किती रुपयांची आहे ही फसवणूक...?

बातम्या आणखी आहेत...