आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदी, चौकसीच्या विरोधात मुंबईतील विशेष कोर्टाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील १२,७१७ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईतील एका विशेष न्यायालयाने पळपुटा व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चौकसी याच्या विरोधात शनिवारी अ-जामीनपात्र अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी केले आहे.

 

“प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए)  अंतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने ईडीच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जावर हे वॉरंट जारी केले आहे. या आधी ईडीने मोदी आणि चौकसी या दोघांना बोलावले होते. मात्र, दोघेही ईडीसमाेर आले नसल्याने त्यानंतर तपास संस्थेने २७ फेब्रुवारी रोजी पीएमएलए न्यायालयात या दोघांच्या विरोधात एनबीडब्ल्यू जारी करण्यासंबंधात अर्ज दाखल करण्यात आला होता.


ईडीचे वकील हितेन वेणेगावर यांनी न्यायाधीश एमएस आजमी यांना सांगितले की, १५ फेब्रुवारी रोजी ईडीने नीरव मोदीच्या विरोधात एक प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्या वेळेपासून आतापर्यंत मोदीला ईडीसमोर सादर होण्यासाठी १५, १७ आणि २२ फेब्रुवारी दरम्यान तीन वेळा समन्स पाठवले आहेत. वास्तविक हे प्रकरण दाखल होण्यापूर्वीच हे दोन्ही आरोपी देश सोडून पळाले असल्याचे मानले जात आहे.  


मागील सोमवारीच पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या अर्जावर सहा देशांना लेटर रोगेटरी (एलआर) जारी केले आहे. यात अमेरिका, ब्रिटन, हाँगकाँग, युएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूरचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...