आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF वर दुसर्‍या तरुणीचा होता डोळा...प्रेयसीने तिच्यावर घडवला बलात्कार, Video ही बनवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुसर्‍या तरुणीने आपल्या प्रियकराचा पिच्छा सोडवा म्हणून प्रेयसीने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर एका नराधमाकरवी बलात्कार करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर प्रेयसीने तरुणीवर बलात्कार होताना अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना भिवंडी येथील गायत्रीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेने कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

राबिया असे बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सतिश उर्फ भीमराव नकलवार, सलीम मोईन खान या दोघांच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

 

तीन वर्षात चार वेळा गर्भपात...
पीडित तरुणी मुंबईतील कफपरेड भागात राहणारी आहे. भिवंडीमधील गायत्रीनगर परिसरात पीडितेची काकू राहते. 2015 मध्ये सुट्यांमध्ये ती काकूच्या घरी आली होती, तेव्हा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी दुकानावर गेली असता त‍िची ओळख आरोपी सतिशसोबत झाली होती. सतिशने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याने तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात पीडित तरुणीचा चार वेळा गर्भपात झाल्याचा प्रकारही समोर आला आहे.

 

राबियाने असा घेतला बदला..

राबियाही सतीशची पहिली प्रेयसी आहे. पीडिता आणि सतीशमधील प्रेमसंबंध राबिया हिला समजले. तिने पीडितेला फोन करून आपले आणि सतिशचे प्रेमसंबध असल्याची माहिती दिली. परंतु, पीडिता सतीशसोबत शरीर संबंध ठेवत असल्याची माहिती ‍राबिया हिला समजली. त्यामुळे संतापलेल्या राबियाने बुरखा घालून पीडितेच्या घरी गेली. तिने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केले. नंतर तिच्यावर नराधम सलीम याच्याकडून बलात्कार करवून घेतला. विशेष म्हणजे पीडितेवर बलात्कार होतानाचा व्हिडीओ राबिया हिने शूट करून घेतला. राबियाने शूट केलेला व्हिडीओ पीडित तरुणीला दाखवला. त्यावेळी तिला धक्काच बसला. पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

 

पीडितेने राबियाला 43 हजार रुपये दिले तरीही तिने धमकी देणे थांबवले नाही.बदनामीच्या भीतीने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या एका मैत्रीणीने रोखले आणि थेट  कुलाबा पोलिस स्टेशन गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून राबियासह तिघांना अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...