आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी- काँग्रेसची मते फाेडून भाजपचे धस 76 मतांनी विजयी; घड्याळ घातलेल्या हातांनीच केली मदत धस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे सुरेश धस यांच्या विजयाची घाेषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जेसीबीतून गुलाल उधळत उस्मानाबाद शहरातून जल्लाेषात मिरवणूक काढली. - Divya Marathi
भाजपचे सुरेश धस यांच्या विजयाची घाेषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जेसीबीतून गुलाल उधळत उस्मानाबाद शहरातून जल्लाेषात मिरवणूक काढली.

उस्मानाबाद - उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल मंगळवारी जाहीर झाला. निवडणुकीच्या ताेंडावर राष्ट्रवादीतून भाजपत अालेले  सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशाेक जगदाळे यांचा ७६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून अाणला हाेता. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या मतदारांनी धनंजय यांना माेठा झटका देत राष्ट्रवादीचा पराभव घडवून अाणला.  भाजप-सेनेपेक्षा आघाडीची अधिक मते असूनही जगदाळे यांना पराभूत व्हावे लागले. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते धस व मंत्री पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर नाराज असलेल्या दाेन्ही काँग्रेसमधील मते भाजपकडे वळवून विजयश्री खेचून अाणली.


विधान परिषदेच्या इतर पाच जागांसाेबत २१ मे रोजी ही निवडणूक झाली होती. मात्र बीडच्या १० नगरसेवकांना अपात्रतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सुमारे २१ दिवस या निवडणुकीच्या मतमाेजणीसाठी प्रतीक्षा करावी लागली. 


खंडपीठाच्या अादेशानुसार मंगळवारी सकाळी ८ वाजता उस्मानाबादेत मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी ११.१५ वाजता वाजता निकाल घोषित केला. एकूण पाच टेबलवर मतमोजणी झाली. एकूण १००५ मतदान असले तरी त्यापैकी माजलगावच्या एका मतदाराने मतदान केले नव्हते. तर उदगीरच्या एका मतदाराने मतपत्रिका उघड करून दाखवल्याने त्याचे मतदान रद्द झाले होते. त्यामुळे एकूण १००३ मतांची मोजणी झाली.  


जेसीबीवरून गुलाल उधळून जल्लोष

निकालानंतर धस यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीवरून गुलाल उधळून जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली.  धस यांनी शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर पुष्पक हॉटेलमध्ये त्यांच्या सत्कार करण्यात अाला.

 

‘घड्याळ’ घातलेल्या ‘हातां’ची मला मदत
धनशक्तीच्या विरोधात हा जनशक्तीचा विजय आहे. राष्ट्रवादीने आयफोन, स्मार्टवॉच अादी साहित्याचे वाटप केले. पक्षाध्यक्षांच्या अादेशाने त्यांच्या नेत्यांनी या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणूक लढवली. पण, घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली. 
- सुरेश धस, विजयी उमेदवार, भाजप

 

काँग्रेसने विश्वासघात केल्यामुळे पराभव
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी होती. सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी गद्दारी केली.     त्यांच्यामुळेच आघाडीची मते फुटली अाहेत.
अशोक जगदाळे, पराभूत उमेदवार

 

 पुढील स्लाईडवर पहा.... मतांचे गणित...

 

 हे हि वाचा, घड्याळ घातलेला ‘हात’ अन‌् जगदाळेंचा घात, सुरेश धस म्हणतात, मला सगळ्यांचीच मदत

 

बातम्या आणखी आहेत...