आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाहाकार..चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 20 जणांना हेलिकॉप्टरने सुखरुप बाहेर काढले, एकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वसई येथील चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 20 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धबधब्याचा प्रवाह वाढला होता. यात 35 जण अडकले होते. झाडाच्या साहाय्याने सगळे उभे होते. पाण्याचा प्रवाहाचा वेग मंदावल्यानंतर काही जण बाहेर निघाले. परंतु धोकादायक ठिकाणी अडकलेल्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

 

या घटनेची वसईच्या तहसीलदारांनी दखल घेतली असून चिंचोटी धबधब्यावर अडकल्या नागरिकांना वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली होते.

 

दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील वाशिंद येथील बोगदा पाण्याखाली गेल्याने तब्बल 42 गावांचा संपर्क तुटला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...