आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ अॉडिओ क्लिप माझीच; मात्र अपूर्ण एेकवण्यात आली : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेनेने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची एक क्लिप दाखवली होती. मुख्यमंत्री निवडणुकीत सामदामदंडभेदाचा वापर करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिप त्यांचीच परंतु पराभव समोर दिसत असल्याने शिवसेनेने     एडिट करून क्लिप दाखवल्याचा आरोप केला आणि संपूर्ण क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार असून एडिट करून क्लिप दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगणार असल्याचे सांगितले.

 

तसेच प्रत्येक गोष्टीला विरोध करणारी ही बाळासाहेबांची शिवसेना नसून शिवविरोध सेना झाल्याची टीकाही त्यांनी केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची १४ मिनिटांची क्लिप ऐकवली आणि शिवसेनेने एडिट करून दाखवलेली क्लिपही ऐकवली.


आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही 

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कोणतेही काम केले की काही लोकांकडून विरोध केला जातो. त्यांनी त्यांच्या प्रचारात पालघरच्या विकासाबाबत भाष्य केले नाही. ते फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नसून ती शिवविरोध सेना झाली आहे.

 

भाजप, शिवसेनेने एकत्र येणे काळाजी गरज : महसूलमंत्री पाटील 
 भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नाहीतर याचा सर्वाधिक लाभ हा दोन्ही काँग्रेसला होईल. यामुळे शिवसेनेशी युती करणे भाजपची अगतिकता आहे,अशी कबुली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात दिली.

 

पालघरमध्ये पराभव समोर दिसत असल्याने  शिवसेना खालच्या पातळीवर उतरली  फडणवीस

 शनिवारी माणिकपूर, वसई येथे सभेत क्लिपबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, पराभव समोर दिसत असल्याने शिवसेना खालच्या पातळीवर उतरली आहे. माझी मूळ ऑडिअो क्लिप १४ मिनिटांची असून ती एडिट करून दाखवली. साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनीती होतो. अापण सत्ता पक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरुपयोग करणार नाही, असे क्लिपमधील माझे शेवटचे वाक्य होते ते दाखवले असते तर शिवसेना तोंडघशी पडली असती, असेही ते म्हणाले.

 

क्लिप एिडट असेल तर कारवाई करा, अन्यथा सीएमनी राजीनामा द्यावा : सेना
ऑडिअो क्लिपबाबत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी स्पष्टीकरण देत शिवसेनेवरच क्लिप एडिट केल्याचा आरोप केला. मात्र हे जर खरे असेल तर शिवसेनेवर कारवाई व्हावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे तातडीची पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आणि आमदार अनिल परब यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

 

देवेंद्र फडणवीस अजूनही एकटा विनासंरक्षण फिरू शकतो  : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी भाषणात पोलिस संरक्षण बाजूला ठेवा आणि पाहा असे म्हटले होते. हैदराबादेत ओवेसीही असेच म्हणाले होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची ओवेसींबरोबर तुलना केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री होण्याअगोदर मी विनासंरक्षण फिरत होतो. परंतु देवेंद्र फडणवीस अजूनही एकटा विनासंरक्षण फिरू शकतो. तुमच्या पक्षातील छोटे नेते संरक्षण घेऊन फिरतात. ते माझ्याकडे संरक्षण मागायला येतात तेव्हा तुम्ही फोन करून संरक्षण द्या असे सांगता,  असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... उद्धव ठाकरे यांनी मुख्‍यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप ऐकवून केला होता हा गौप्यस्फोट...

 

बातम्या आणखी आहेत...