आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील भायखळ्याच्या राणीच्या बागेत अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विनने पिल्लाला जन्म दिला. मुंबईतच नाही तर देशात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.
हंबोल्ट पेंग्विन मिस्टर मॉल्ट ( वय-3 वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (वर्षे 4.5 वर्षे) यांचे हे पिल्लू आहे. अंडे दिल्यानंतर साधारण 40 दिवसांनी पिलाचा जन्म झाला.
पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने जुलै महिन्यात अंडे दिले होते. 15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी अंड्यातून पिल्लू बाहेर आले. डॉ. संजय त्रिपाठी आणि त्यांचे पथक या पिलाची काळजी घेत आहे.
पुढील साइड्सवर क्लिक करून पाहा... देशात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विनचे फोटो आणि व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.