आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्टने 13 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी, 24 आठवड्यांचा गर्भ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई हायकोर्टने दुष्कर्माची शिकार ठरलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला 24 आठवड्यांचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. पीडितेच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करून गर्भपात करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ति नरेश पाटील व न्यायमूर्ति अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

 

मुलीचे अपहरण करून नराधमाने केला बलात्कार
- याचिकेनुसार, पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. शेजारी राहाणार्‍या नराधमाने जुलै 2017 मध्ये पीडितेचे अपहरण केले होते. घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर पोलिसांनी 17 मार्च 2018 रोजी मुलीला आरोपीच्या तावडीतून सुटका केली होती.

 

नातेवाईकांनी केला होता गर्भपाताचा प्रयत्न...
- पीडिता घरी परतल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या नातेवाईकांना समजले. ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु, पीडितेच्या गर्भात वाढणारे भ्रुण 24 आठवड्यांचे असल्याची डॉक्टरांनी सांगितले. कोर्टाच्या परवानगीशिवाय गर्भपात करता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
- डॉक्टराला 20 आठवड्यांचा केवळ 20 आठवड्यांचा गर्भपात करण्याची कायदेशीर परवानगी आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी निमसरकारी संस्था 'बेटी बचाओ'च्या सहकार्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

 

या आधारावर हायकोर्टाने दिली परवानगी...
- पोलिसांनी नराधमाच्या तावडीतून पीडितेची सुटका केली तेव्हा ती गरोदर होती. पोलिसांनी ही माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. वेळ निघून गेल्यानंतर ही माहिती समोर आल्याचा युक्तीवाद पीडितेच्या वकीलांनी केला.
- डॉक्टरांचा अहवालाच्या आधारे हायकोर्टाने पीडितेला गर्भपात करण्‍याची परवानी दिली. आज (मंगळवार) पीडितेला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे कोर्टाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...