आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब हवामानात कंपनीने जबरदस्तीने केले टेक ऑफ..मारिया झुबेरी यांच्या पतीचा गंभीर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जुहूवरुन उड्डाण घेतलेले चार्टर्ड विमान  घाटकोपरमध्ये कोसळले. या भीषण अपघातात महिला वैमानिकासह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आज ( गुरुवार) दुपारी सव्वा वाजता हा अपघात झाला. महिला वैमानिक मारिया झुबेरी, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

 

हवामान खराब असतानाही कंपनीने जबरदस्तीने केले टेक ऑफ केल्याचा गंभीर आरोप मृत वैमानिक मारिया झुबेरी यांचे पती अॅड. प्रभात कथूरिया यांनी केला आहे. अॅड: कथूरिया यांनी सांगितले की, हवामान खराब होते. त्यामुळे मारियाने उड्डाणाला विरोध केला होता. अशा खराब हवामानात विमानाची चाचणी होणार नाही, असे मारियाने सांग‍ितले होते. मारियाचा विरोध असतानाही यूवाय एव्हिएशन कंपनीने जबरदस्ती विमानाची चाचणी घेतली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.

 

मारिया झुबेरी ही मीरारोड येथील रहिवासी आहे. तिच्या पश्चात पती अॅड. प्रभात कथूरिया आणि 12 वर्षीय मुलगी आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. विमान अपघातीची फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...