आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plane Crash: विमान कोसळताच उठले आगीचे डोंब..फोटोंमधून पाहा अपघाताची भीषणता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जुहू येथून टेस्टिंगसाठी उड्डाण घेतलेले एका खासगी कंपनीचे चार्टर्ड विमान आज (गुरुवार) दुपारी कोळसले. घाटकोपर पश्चिमच्या जीवनदयाल लेनमध्ये सर्वोदय रुग्णालयाजवळ विमान कोसळले. एका निर्माणाधीन इमारतीवर विमान कोसळताच आगीचे डोंब उठले. विमान जळून खाक झाले असून या भीषण अपघातात महिला वैमानिकासह एकूण पाच जणांचा होळपळून मृत्यू झाला आहे. यात तीन तंत्रज्ञ व एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू समावेश आहे.

 

अपघातग्रस्त चार्टर्ड विमान व्हीटी यूपीझेड किंग एअर सी-90 या कंपनीचे होते. उत्तर प्रदेश सरकारने हे विमान या कंपनीला विकले होते. घटनास्थळी फायरबिग्रेड, एनडीआरएफ पोलिस दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

विमान कोसळताच मोठा आवाज झाला. परिसरात आगीचे डोंब उठले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची भीषणता दर्शवणारे फोटो समोर आले आहेत.

 

दरम्यान,  झरच्या (जि. नाशिक) विमानतळावरून काल, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता चाचणीसाठी उड्डाण घेतलेले सुखोई-30 एमकेआय- एसबी 210 हे लष्कराचे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या 20 मिनिटांतच निफाड तालुक्यातील गोरठाण व वावी शिवारात कोसळले. प्रसंगावधान राखत दोन्ही पायलटनी पॅराशूटद्वारे उडी घेतल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र तब्बल 357.14 कोटी रुपये किमतीचे हे विमान चक्काचूर झाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. विमान कोसळताच उठले आगीचे डोंब..फोटोंमधून पाहा अपघाताची भीषणता

 

बातम्या आणखी आहेत...