आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाघोटाळ्यामुळे PNB ला \'बुरे दिन\'; नीरव मोदीमुळे बॅंकेवर मालमत्ता विकण्याची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) थकबाकी परत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पीएनबीला बुरे दिन आले आहे. पीएनबीने मार्चपर्यंत आपली काही मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचा वापर होत नाही, अशा कार्यालयांचा यात समावेश आहे. ही मालमत्ता विकून यातून 500 कोटी रुपये मिळतील, अशी पीएनबीला अपेक्षा आहे.

 

नीरव यांचा आरोप...

घोटाळा सार्वजनिक करण्याबाबत बँकेने घाई केल्याचा आरोप करत यामुळे माझा ब्रँड आणि व्यवसाय बुडाला असल्याचे नीरवने एका पत्रात म्हटले आहे.

 

वृत्तसंस्थेनुसार, नीरवने हे पत्र 15 ते 16 फेब्रुवारीदरम्यान लिहिलेले होते. मात्र बँकेने 14 फेब्रुवारीला 11,394 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे जाहीर केले. नीरवचा दावा आहे की, त्याच्यावरील बँकांची देणी 5 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. त्याने बँकेच्या खात्यातील आपल्या रकमेतून 2,200 कर्मचाऱ्यांचे पगार देऊ देण्याची परवानगीही मागितली आहे.

 

अनेक कार्यालये रिकामे..
पीटीआयनुसार, बँकेकडे अनेक कार्यालये असे आहेत की ते रिकामे पडले आहेत. ते वापररात नाहीत. या फिक्‍स अॅसेट विकून मोठी रक्कम उभी करता येईल. योग्य किंमत आल्यास येत्या मार्चपर्यंत बँक ही मालमत्ती विक्री करणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... गुजरातमध्ये पापड विकत होते नीरव मोदीचे कुटुंब, आता 10 देशात हिऱ्यांचा व्यापार

बातम्या आणखी आहेत...