आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वळले..पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यभरात अतिवृष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/मुंबई- ओडिशावर बनलेले चक्रीवादळ मध्यप्रदेश व गुजरातकडून राजस्थानकडे वळणार होते. परंतु चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. आता या वादळाने महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्‍ट्र अतिवृष्‍टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

हवामान विभागाकडून यापूर्वी 9 आणि 10 जुलैला जोधपूरसह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता 12 जुलैनंतर राजस्थानात पाऊस होईल, असे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटे सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंदमाता, कुलाबा, माटुंगा, दादर, सांताक्रूज आणि सायन परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने सलग दुसर्‍या दिवशी पश्चिम रेल्वे लाइनवर लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. बोरीवली-चर्चगेट, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाइनवरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. बोरीवलीत तीन घरे कोसळले आहेत.

 

जोरदार पावसाचा अंदाज चुकला...
ओडिशात उठलेल्या चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वळले आहे. परिणामी जोधपूरमध्ये अद्याप दमदार पाऊस होऊ शकला नाही. हवामान तज्ज्ञ गोविंदराम सीरवी यांनी सांगितले की, जोधपूर शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहरचे सोमवारी कमाल तापमान 40.4 तर किमान तापमान 31.3 डिग्री सेल्सियस होते.

 

बातम्या आणखी आहेत...