आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पतीनेच केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या; मृतदेह घराशेजारील शेतात पुरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गरोदर पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घराशेजारील शेतात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील आनगाव येथे ही घटना घडली आहे. कल्पेश ठाकरे असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

अनगाव येथील कल्पेश ठाकरे याने 12 मार्च रोजी आपली गरोदर पत्नी घरातून निघून गेल्याची गणेशपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. नंतर तो वारंवार पोलिस ठाण्यात येऊन बेपत्ता पत्नीच्या शोधासाठी गणेशपुरी पोलिसांकडे सारखा तगादा लावत होता.

 

आरोपी पतीने स्वत: दिली कबुली...
या प्रकरणाचा पोलिस तपास करीत असताना तब्बल नऊ दिवसांनी कल्पेश यानेच पोलिसांना आपण पत्नीची अंबाडी येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर तिचा मृतदेह अनगाव येथील घरामागील शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला व तो  शवविच्छेदनाकरीता इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... माईला होते दारु आणि सिगारेटचे व्यसन...

 

बातम्या आणखी आहेत...