आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rape Threat Case: प्रियांका चतुर्वेदींच्या कन्येला बलात्काराची धमकी देणार्‍या भामटयाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या 10 वर्षीय कन्येला ट्‍विटरद्वारे बलात्काराची धमकी देणार्‍या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश महेश्वर असे आरोपीचे नाव असून मुंबई पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथे अटक केली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दिंडोसी कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल‍ी आहे.

 

आरोप‍ी मूळ राजस्थानचा रहिवासी असून अहमदाबाद येथे मागील अनेक वर्षांपासून राहातो. आरोपीने 2 जुलैला प्रियांका चतुर्वेदी यांच्या कन्येला बलात्काराची धमकी दिली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या न‍िर्देशानुसार मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

आरोपीने त्याच्या ट्‍विटर हॅंडलच्या माध्यमातून अत्यंत घाणेरडे ट्‍वीट करून बलात्काराची धमकी दिली होती. गृहमंत्रालयाने ट्‍विटरला अकाउंट यूजर  'GirishK1605' बाबत सविस्तर माहिती मागितली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आरोपीचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...