आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MURDER: नवी मुंबईत भररस्त्यावर पुण्यातील बिझनेसमनची हत्या; कॅमेर्‍यात कैद झाली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यातील एका बिझनेसमनची अज्ञात मारेकर्‍यांनी चाकू भोसकून आणि गोळी झाडून निर्घृण हत्या केली. बुधवारी रात्री बिझनेसमन घर येत असताना त्याची हत्या करण्यात आली. सतराम कोटल (वय-33) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. फुटेजच्या आधारावर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, ही घटना नवी मुंबईतील कामोठे भागात सेक्टर 6A, एलोरा हाइट्सजवळ घडली. तपास अधिकारी देवदास सोनवाने यांनी सांगितले की, दोन अज्ञात मारेकरी एक बाईकअर आले आणि त्यांनी सतराम कोटल यांनी चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात कोटल हे जमिनीवर कोसळले. नंतर मारेकर्‍यांनी त्यांच्यावर गोळी झाडून ते फरार झाले. कोटल यांचा जागेवरच मृत्यू झाला. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...