आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई जलमय..नालासोपारा स्टेशनवर \'शताब्दी\' अडकली, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटे सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंदमाता, कुलाबा, माटुंगा, दादर, सांताक्रूज आणि सायन परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने सलग दुसर्‍या दिवशी पश्चिम रेल्वे लाइनवर लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नालासोपारा स्टेशनला नदीचे रुप प्राप्त झाले आहे. शताब्दी एक्स्प्रेस स्टेशनवर अडकून पडली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

 

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लाइनवरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. बोरीवलीत तीन घरे कोसळले आहेत.

 

गेल्या 24 तासांत मुंबईत 165.8 मिमी तर उपनगरात 184.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  विरारमध्ये 24 तासांत 235 मिमी तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

 

Updates:

- पावसामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द
- मुंबई-पुणे अप डाऊनच्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा निर्णय.
- मानखूर्द स्टेशनवरील रेल्वे ट्रॅकवर पाणी, वाशी ते सीएसएमटी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प

- मुसळधार पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम.. 72 उड्डाणांच्या वेळेत बदल करण्‍यात आला आहे.
- मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल रद्द करण्‍यात आली आहे.
- अतिपावसामुळे आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण मुंबईतील बहुतेक शाळांच्या सकाळच्या सत्रामधील वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे.
- भिवंडी बायपासवरील साकेत ब्रिजला तडे गेल्यामुळे रस्ता खचला आहे.
- हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्‍यात आली आहे.
- मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे तर पश्चिम रेल्वेची बोरिवली-चर्चगेट वाहतूक 15 मिनिटे उशिराने
- मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार, अनेक ठिकाणी पुन्हा पाणी साचले आहे.
- विमानतळाशेजारी भिंतीचा भाग कोसळला, तीन मालवाहू गाड्यांचेळ मोठे नुकसान झाले आहे.

 

हेही वाचा..कोकणातील अति पावसामुळे राज्य सरप्लस; आतापर्यंत महाराष्ट्रात 30% जास्त पाऊस, ९ जिल्ह्यांत तूट

 

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, मुंबईतील सर्व शाळांना मंगळवारी

सुटी नाही. मुंबईत अतिवृष्‍टीचा इशारा नाही. परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तसेच बीएमसीचे पथके तैनात करण्‍यात आली आहे. दुसरीकडे, मुंबईत अतिवृष्‍टी असल्याचे विधानसभेत सांगितले. यावरून सरकारमधील नेत्यामध्ये दुमत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, अाषिश शेलार यांनी मुंबईसह परिसरातील सर्व शाळांना सुटी देण्‍याची मागणी केली आहे.

 

पुढील 2 दिवस पावसाचा जोर कारम राहाणार- हवामान विभाग
दरम्यान, पुढील दोन दिवस मुसधार पावसाचे असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरज पडल्यावरच घराबाहेर पडावे, असा इशारा महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने दिला आहे.

 

राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

 

मुंबई, कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उत्तर-मध्य महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मंगळवारी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाटकोपर येथील रेल्वे स्टेशनवरील एका पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे या पूल दळणवळणासाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुंबईतील पावसाच्या जोरदार बॅटिंगचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...