आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्यांमध्ये राज ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरेंचे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वेगमर्यादा, सिग्नल न पाळणे, नो एण्ट्रीत गाडी घुसवणे, झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणे अशाप्रकारच्या नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणार्‍यांची मुंबई वाहतूक पोलिसांनी यादी तयार केली आहे. तसेच सुमारे 119 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. धक्कादायक म्हणजे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता सलमान खान यासारख्या दिग्गजांची नावे दंड न भरणार्‍यांच्या यादीत आहे.


'मुंबई मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या घरी ई-चलन पाठवून दंड वसुलीचे निर्देश दिले जातात. मात्र अनेक जण अशी ई-चलन घरी आल्यानंतर दंडच भरत नाहीत. असा दंड थकवणाऱ्यांची मुंबई वाहतूक पोलिसांची यादी तयार केली आहे. यादीत चक्क परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आदी दिग्गजांची नावे आहेत. या मंडळींच्या घरी वाहतूक पोलिसांनी ई चलन पाठवले आहे. मात्र, या सर्वांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर वापरत असलेल्या गाडीचा क्रमांक देखील यादीत आहे. कॉमेडीयन कपिल शर्मा, भाजप प्रवक्ते राम कदम यांनीही ई चलन पाठवण्यात आले आहे. त्यांनी अद्याप दंड भरलेला नाही.

 

कोणावर किती दंड?
आदित्य ठाकरे- गाडी क्रमांक MH 02 CB 1234
- 10 डिसेंबर 2016 - झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड
- 8 जानेवारी 2018 – वेग मर्यादेचे उल्लंघन – 1 हजाराचा दंड
- 23 जानेवारी 2018 - वेग मर्यादेचे उल्लंघन – 1 हजाराचा दंड
- 11 मार्च 2018 वेग मर्यादेचे  उल्लंघन – 1 हजाराचा दंड
- 29 एप्रिल 2018 - वेग मर्यादेचे उल्लंघन – 1 हजाराचा दंड
- 1 मे 2018 - वेग मर्यादेचे उल्लंघन – 1 हजाराचा दंड
- 3 मे 2018 - वेग मर्यादेचे उल्लंघन– 1 हजाराचा दंड

 

राज ठाकरे – गाडी क्रमांक- MH 46 J 9
– 28 फेब्रुवारी 2017- फॅन्सी नंबरप्लेटसाठी 1 हजाराचा दंड.
- झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड

 

परिवहन मंत्री दिवाकर रावते- गाडी क्रमांक- MH 06 BE 4433
- वेग मर्यादेचे उल्लंघन- 1 हजार रुपये.

 

अरबाज खान- गाडी क्रमांक MH 02 BY 2727
- 23 जानेवारी 2018 – वेग मर्यादा न पाळणे– 1 हजाराचा दंड
10 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड,
31 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड,
21 जुलै 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड

 

कपिल शर्मा- गाडी क्रमांक- MH 04 Fz 770
– 2 हजार रुपये थकीत

 

बातम्या आणखी आहेत...