आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची नवी फौज..10 नेते, 12 सरचिटणीस, शिशीर शिंदेंचे कुठेच नाव नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी नवी फौज उभी केली आहे. अर्थात मनसेने नवी कार्यकारिणी तयार केली आहे. नव्या कार्यकारणीत राज ठाकरे अध्यक्ष तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस असणार आहे. मनसेने नव्या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती.

 

शिशिर शिंदेंचे नाव कुठेही नाही..

मनसेमधील बंडखोर शिशीर शिंदे यांचे नाव कार्यकारणीत कुठेच नाही. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. शिंदे आता शिवसेनेच्या गोटात सामिल होतात की काय, अशी चर्चा मनसेसह राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

कार्यकारणीतील नेते..
-बाळा नांदगावकर
-नितीन सरदेसाई
-शिरीष सावंत
-संजय चित्रे
-दीपक पायगुडे
-अविनाश अभ्यंकर
-अनिल शिदोरे
-जयप्रकाश बाविस्कर
-प्रमोद (राजू) पाटील
-अभिजित पानसे

 

कार्यकारणीतील सरचिटणीस..

-मनोज चव्हाण
-आदित्य शिरोडकर
-परशुराम उपरकर
-हेमंत गडकरी
-बाबा जाधवराव
-प्रकाश भोईर
-राजेंद्र शिरोडकर
-राजीव चौगुले
-यशवंत देशपांडे
-शालिनी ठाकरे
-रिटा गुप्ता
-अशोक मुर्तडक

 

 

बातम्या आणखी आहेत...