आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका..\'बाबांनो, हेच ते अच्छे दिन\', Raj Thackeray यांचे मार्मिक भाष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  मुंबई- देशात सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरात 30 तर डिझेलच्या दरात 20 पैशांनी वाढ झाली आहे. परिणाम मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला आहे. राज   ठाकरे यांनी 'बाबांनो, हेच ते अच्छे दिन', या व्यंगचित्रातून गेल्यावर्षी मोदी सरकारला टोला लगावला होता. आता पेट्रोल-डिझेल दरवाढीवर याच व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य केले आहे.

 

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत होर्डींग्स लावण्यात आली आहेत. मनसेने हे होर्डिग्स लावले आहे. यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनाव होत असतो. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून मोदी सरकारने महागाईला आमंत्रण दिले आहेत. भाजीपाल्याच्या दरात वाढ, एसटीची भाडेवाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...