आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांनंतर राज ठाकरे औरंगाबादेत..बाळासाहेब पाथ्रीकरांच्या वतीने वाळूज चौकात स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन वर्षांनंतर प्रथमच बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे वाळूज चौकात मनसे शेतकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाथ्रीकर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी अशोक तावरे, भास्कर गाडेकर, पाराजी चितळे, रियाज पटेल, सुशांत भुजंगे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पदाधिकारी मेळाव्यासाठी आलेल्या विविध नेते मंडळीचेही या वेळी स्वागत करण्यात आले. दरम्यान, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ठाकरे यांना पाहताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश भरला होता. 

 

राज यांचे बुधवारी संध्याकाळी 4 शहरात आगमन झाले. तीन दिवस त्यांचा मुक्काम शहरात असणार आहे. मुंबईहून आलेले मनसे नेते राजू पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या दौऱ्याबाबत माहिती दिली. पक्ष बांधणी आणि मनसेची विस्कळीत झालेली घडी सावरणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 

ते म्हणाले, या दौऱ्यादरम्यान ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. 19 जुलै रोजी दुपारी तापडिया नाट्य मंदिरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ते शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. 20 जुलै रोजी ते पैठण येथे जाणार असून बिडकीन येथील एका उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर ते जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांसह अंबाजोगाईचा ते दौरा करणार आहेत. 

 

राज ठाकरे प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणार असून विविध क्षेत्रांत कार्यरत स्थानिकांशीही ते चर्चा करणार आहेत. 24 जुलै रोजी बीड येथे हा दौरा संपणार आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मरगळ दूर होऊन कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी स्वीय सहायक हर्षल देशपांडे, राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, गजानन गौडा, शैलेश क्षीरसागर, संदीप कुलकर्णी, अब्दुल रशीद आदींची उपस्थिती होती.

 

बातम्या आणखी आहेत...