आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • विधान परिषदेसह रिपाइंला हवेत राज्यात 40 पदे; रामदास आठवले मुख्यमंत्र्यांना भेटणार Ramdas Athawale Seeks Ministerial Berth For His Party RPI In Fadnavis Cabinet

विधान परिषदेसह रिपाइंला हवेत राज्यात 40 पदे; रामदास आठवले मुख्यमंत्र्यांना भेटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी विधान परिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा 1 आमदार, महामंडळाची 3 अध्यक्षपदे आणि संचालक सदस्यांची 40 पदे मिळावीत, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

 

आठवले यांनी यांसदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 वर्षे होत आहेत. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एकही मंत्री नसल्याने आंबेडकरी समाजातून रिपाइंच्या सत्तेतील सहभागाची मागणी वाढली आहे. सध्या विधान परिषद सदस्य पदांची निवडणूक 16  जुलै रोजी होत असून त्यात भाजपच्या कोट्यातील 5 जागा निवडून येण्याची शक्यता आहे.

 

या पार्श्वभूमीवर रिपाइंला एक विधान परिषद सदस्यत्व मिळण्याची आग्रही मागणी आहे. तसेच महामंडळाची अध्यक्षपदे आणि सदस्य पदांमध्ये रिपाइंला समाधानकारक सहभाग मिळावा, अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...