आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुंबईत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाच्या हातात बेड्या Rape On Minor Girl In Mumbai, Reality Show Contestant Arrested

अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; नराधम रिअॅलिटी शोचा स्पर्धक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्‍यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिअॅलिटी शो स्पर्धकाला अटक केली आहे. आदित्य गुप्ता (20) असे आरोपीचे नाव असून त्याला नालासोपारा भागातून अटक करण्यात आली.

 

सूत्रांनुसार, आरोपीने मुलीचे अपहरण केले. नंतर तिला खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन नालासोपाऱ्यातील राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी डीएन नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

मॅकडॉनाल्डमध्ये सापडली पीडिता...

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी डीएन पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती  अंधेरीतील मॅकडॉनाल्डमध्ये सापडली.

भाभा हॉस्पिटलमध्ये तिची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले.

 

इन्स्टाग्रामवरुन झाली मैत्री..

पीडितेने पोलिसांना सांगितले की, इन्स्टाग्रामवर तिची आणि आदित्यची ओळख झाली होती. आदित्यने तिला रविवारी मॅकडोनाल्डमध्ये भेटायला बोलावले होते. नंतर तो तिला नालासोपाऱ्यातील घरी घेऊन गेला. खाद्य पदार्था‍तून त्याने तिला गुंगीचे औषध दिले आणि नंतर तिच्या बलात्कार केला.नंतर पुन्हा लोकल ट्रेनने अंधेरीला आणून सोडले. आदित्य गुप्ता याला विरोधात पोक्सो कायद्यानुसार अटक करण्‍यात आली आहे. पोलिस आदित्यचे कॉल डिटेल्स तपासत आहेत.

बातम्या आणखी आहेत...