आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांचा संप..गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या 3 दिवसीय संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शासकीय रुग्‍णालयातील डॉक्टरही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. बुधवारी सकाळी गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास ठाण्यातील सामान्य रुग्णालयाने नकार दिला. महिलेला दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही महिला आदिवासी आहे.

 
संपामुळे ठाण्यातील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी नसल्यामुळे गरोदर महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यात नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

राज्यात आरोग्य सेवा विस्कळीत
मुंबईतील अनेक रुग्णालयांत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबईतील जे. जे, कामा, जी.टी. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात परिचारका आणि वॉर्डबॉय संपावर होते. सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा संपूर्णपणे कोलमडली होती. जेजेमधील 2 हजार 599 कर्मचारी संपावर आहेत. 240 परिचारक आणि 40 सफाई कामगारांना रुग्णालय प्रशासनाने तात्पुरते कामावर घेतले आहे.

 

सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये 650 कर्मचारी संपावर आहेत. ईसीजी काढणे, सलाइन लावणे अशी कामे डॉक्टरच करत आहेत. वैद्यकीयच्या 200 विद्यार्थ्यांना रुग्णांच्या मदतीसाठी नेमण्यात आले आहे. महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...