आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju मधून गुन्हेगारीचे समर्थन..RSSच्या मुखपत्रातून \'संजू\'वर टीका, राजकुमारांनाही फटकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता संजय दत्त याच्या वादग्रस्त आयुष्यावर प्रदर्शित झालेला 'संजू' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'पाञ्चजन्य'मधून 'संजू' सिनेमावर खोचक टीका करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 'संजू'चे दिग्दर्शक राजकुमार हिरानींचेही कान उपटले आहे. सिनेमातून संजय दत्तची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा हिरानी यांचा उद्देश होता का? असा सवालही केला आहे.

 

संजूमधून गुन्हेगाराचे समर्थन..
संजू सिनेमातून गुन्हेगाराचे समर्थन करण्यात आल्याचा आरोप 'पाञ्चजन्य'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती  स्टार कशी होऊ शकते, असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला. संजय दत्तची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

दरम्यान, 29 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'संजू' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 284 कोटींचा गल्ला कमावला आहे. आगामी काळातही हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

 

सिनेमात बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. सोबतच परेश रावल, दिया मिर्झा मनिषा कोईराला, विक्की कौशल,  यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...