आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन तस्कर वीरप्पनवर इम्प्रेस झाली होती ही तरुणी; यूनिक आहे ही लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनपर तब्बल 184 गुन्हे होते. तरी देखील त्यापर्यंत पोहोचण्यासाठी पो‍लिसांसह आर्मीला तीन दशकांचा काळ लागला. वीरप्पनच्या मागावर तीन राज्यांचे पोलिस होते. त्यावर सरकारचे सुमारे 20 कोटी रुपये खर्च झाले होते. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, वीरप्पनचा एका तरुणीवर जीव जडला होता. तेव्हा तो 29 वर्षाचा होता. मुत्तुलक्ष्मीला पाहाताक्षणी वीरप्पन तिच्या प्रेमात पडला होता.

 

वीरप्पनने असा केला मुत्तुलक्ष्म‍ीला प्रपोज..

- वीरप्पन याने मुत्तुलक्ष्मीला 1989 मध्ये पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हा तो धर्मपुरी जिल्ह्यातील नेरुपूर या गावी जात होते.
- मुत्तुलक्ष्मी ही कावेरी नदीवरून पाणीचा हंडा घेऊन येत असताना तिच्याकडे वीरप्पनचे लक्ष गेले.
- वीरप्पनने मुत्तुलक्ष्मीची भेट घेतली. तो तिला म्हणाला, 'मी कधीही लग्नाचा विचार केला नव्हता. परंतु तुला पाहिल्यानंतर आता लग्न करावे, असे वाटत आहे. तू होणार दिला नाही तर आयुष्यात कधी लग्नांचा विचार मनात येणार नाही.'
- वीरप्पनच्या याच वाक्यावर मुत्तुलक्ष्मी फिदा झाली होती. दोघांनी 1990 मध्ये लग्न केले होते.

 

दोन मुली, घेत आहेत इंजिनिअरिंगचे शिक्षण...
- लग्नानंतर वीरप्पन आपल्या पत्नीसोबत तमिळनाडु, कर्नाटक आणि केरळच्या सीमेवर असलेल्या जंगलात राहात होता.
- वीरप्पन आणि मुत्तुलक्ष्मीला दोन मुली आहेत. विद्यारानी आणि प्रभा, दोन्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत.
- मुत्तुलक्ष्मी ही तमिळनाडुतील धर्मापूरी जिल्ह्यातील एका गुराख्याची मुलगी.
- मुत्तुलक्ष्मी सध्या तमिळनाडुमधील सेलम येथे सामजिक कार्य करते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. चंदन तस्कर वीरप्पनचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...