आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावत’विरुद्ध आठ राज्यांमध्ये ताेडफाेड; राजस्थानात प्रदर्शित नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- देशातील आठ राज्यांत तोडफोड व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी कडक सुरक्षाव्यवस्थेत जेमतेत प्रदर्शित झाला. तोडफोड हाेण्याच्या भीतीने चित्रपटगृहांच्या मालकांनी अनेक ठिकाणी चित्रपट दाखवला नाही. चित्रपट उद्याेगातील सूत्रांनुसार हा चित्रपट सुमारे ७ हजार स्क्रीन्सवर दाखवण्यात येणार हाेता; परंतु पहिल्या दिवशी केवळ ४ हजारवर स्क्रीन्सवर दाखवला गेला. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गोव्यात न दाखवण्याची घाेषणा यापूर्वीच करण्यात अाली हाेती. गुरुवारी हरियाणा, बिहार व उत्तर प्रदेशातही काही जिल्ह्यांत चित्रपट दाखवण्यात अाला नाही. तसेच जेथे दाखवण्यात अाला तेथेही लोकांनी भीतीच्या सावटाखाली पाहिला. सकाळच्या शोला दिल्लीत ६०-७० %, तर मुंबईत केवळ ४०-४५ % प्रेक्षकसंख्या हाेती. 


दरम्यान, करणी सेनेने भारत बंदची घाेषणा करून अनेक ठिकाणी अांदाेलन करून माेर्चे काढले. राजस्थानातील उदयपूर व उत्तर प्रदेशाच्या सीतापूरमध्ये मारहाण व तोडफोड करण्यात अाली. वाराणसीत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. राज्यांत सुरू असलेल्या हिंसेची जबाबदारी केंद्र सरकारने झटकली अाहे. याबाबत बाेलताना गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची अाहे. गरज पडल्यास अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करण्याशिवाय केंद्राची या प्रकरणात कोणतीही भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

> करणी सेनेचे महासचिव सूरजपाल अमू यांना अटक, संघटनेचा उत्तर प्रदेशप्रमुखही अटकेत, मुंबईत केवळ ४०-५० % प्रेक्षक

 

 

> छत्तीसगड : जवळपास सर्वच जिल्ह्यांत कडक सुरक्षेत चित्रपट दाखवला. विरोध करणारे १००हून अधिक जण अटकेत.
> उत्तरप्रदेश : सीतापुरात एससीएम मल्टिप्लेक्सचे मालक संजय अग्रवाल यांना मारहाण. बीएमडब्ल्यू कारची तोडफाेड. अनेक जिल्ह्यांत दाखवला नाही. करणी सेनेचे उत्तरप्रदेशप्रमुख कर्णसिंहसह २६ जणांना अटक.
> बिहार : मुजफ्फरपूर-हाजीपूर मुख्य रस्त्यावर आगी लावून चार तास चक्का जाम अांदाेलन. पाटण्यात माेर्चा. अनेक चित्रपटगृहांनी प्रेक्षकांना अॅडव्हान्स बुकिंगचे पैसे परत दिले. राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात विरोध करण्यात अाला.
> मध्य प्रदेश : चित्रपटगृहांच्या मालकांची मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याशी चर्चा. राज्यात विविध भागांत चित्रपटाविराेधात अांदाेलने सुरूच. बालाघाटमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला.
> गुजरात : करणी सेनेच्या बंदचा फियास्काे. अहमदाबाद-मेहसाणा व बनासकांठाची वाहतूक सेवा बंद हाेती.

 

कांंॅग्रेसचे पुनावाला यांनी दाखल केली याचिका; सोमवारी हाेणार सुनावणी
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही हिंसा रोखण्यास असमर्थ ठरलेल्या चार राज्य सरकारांसह करणी सेनेविराेधात सर्वाेच्च न्यायालयात दोन अवमान याचिका दाखल झाल्या अाहेत. त्यावर सोमवारी सुनावणी होईल. कांॅग्रेस नेते तहसीन पुनावाला यांनी राजस्थान, हरियाणा, गुजरात व मध्य प्रदेश सरकारविरुद्ध याचिका दाखल केल्या अाहेत. तसेच अॅड. विनीत ढांडा यांनी हिंसाचार करणाऱ्या करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अवमाननेची कारवाई करण्याची मागणी केली अाहे. चित्रपटाचे सेन्सर प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिका स्वीकारण्यात अाली नाही.

 

शालेय मुलांच्या बसवर दगडफेक; १८ जणांना अटक 
- हरियाणा : सोनीपत, यमुनानगर, पंचकुला, सिरसा, करनाल, कुरुक्षेत्र व फतेहाबादमध्ये अनेक चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवला गेला नाही. गुडगावात शालेय मुलांच्या बसवर दगडफेक करणाऱ्या १८ जणांना अटक. बुधवारच्या या घटनेमुळे बहुतांश शाळा बंद हाेत्या. करणी सेनेचे महासचिव व माजी भाजप नेते सूरजपाल अमू अटकेत.
- राजस्थान : राज्यात चित्रपट प्रदर्शित झाला नाही; परंतु तरीही ठिकठिकाणी चक्का जाम व अांदाेलन झाले. जयपुरात करणी सेनेने दुचाकी रॅली काढली. चिताेडगडमध्ये शाळा बंद करण्यात अाल्या. कोटा-बुंदी व उदयपूर-चिताेडगड महामार्गावर चक्का जाम. उदयपुरात दोन डझन दुकानांत तोडफोड झाली.

 

पाकिस्तानात दृश्ये न कापता प्रदर्शित होणार ‘पद्मावत’
भारतात विरोधाचा सामना करणारा ‘पद्मावत’ चित्रपट पाकिस्तानात दृश्ये न कापता प्रदर्शित होणार अाहे. पाकिस्तानच्या सेन्सर बोर्डाने चित्रपटास ‘यू’ प्रमाणपत्र दिले अाहे. अलाउद्दीन खिलजीला नकारात्मक भूमिकेत दाखवल्याने पाक काही दृश्य कापू शकताे, अशी शक्यता व्यक्त हाेत हाेती. चित्रपट सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष मोबशिर हसन यांनी कला, सर्जनात्मकता व स्वस्थ मनोरंजन पाहता बोर्ड पक्षपाती नसल्याचे सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...