आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; \'बेस्ट\'च्या चालकाला अटक Sexual Assaulting A Minor Girl In Bus, Driver Arrest By Mumbai Police

धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; \'बेस्ट\'च्या चालकाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खासगी बसमधून प्रवास करताना अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्‍या चालकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. शिर्डी ते मुंबईदरम्यान 13 जून ही घटना घडली होती. या प्रकरणी कुरार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

सूत्रांनुसार, पीडित मुलगी कुरार परिसरात आई-वडिलांसोबत राहते. मुलगी आई-वडिलांसोबत 13 जून रोजी शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेली होती. शिर्डीहून मुंबईला ते खासगी बसने ये होते. मुलगी आईच्या पाठीमागील सीटवर बसली होती. संगमनेर येथून आरोपी बसमध्ये चढला. तो मुलीच्या शेजारच्या सीटवर बसला. त्यावेळी त्याने मुलीसोबत अश्लील चाळे केले. मात्र, भीतीपोटी मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही.

 

आईने दिलेल्या तक्रारीवरून कारवाई...
घरी आल्यानंतर पीडितेने आईला आपबिती सांगितली. आईने दिलेल्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी आरोपी सोपान उगले याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

आरोपी 'बेस्ट'चा चालक
पोलिस खबर्‍याच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपी गोरेगाव बेस्ट बस डेपोमध्ये चालक आहे. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपी पळून जाण्याच्या तयारी होता. त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

बातम्या आणखी आहेत...