आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळावर लढून जिंकायचेच..आदित्य ठाकरेंची गर्जना; भाजपने पालघर चीटिंग करून जिंकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेची ताकद महाराष्ट्राला ठाऊक आहे. आता स्वबळावर लढून एकहाती सत्ता आणायचीच, अशी गर्जना युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचा आज (ता. 19) 52 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यंदा हा सोहळा षण्मुखानंद हॉलऐवजी गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित कार्यक्रमांत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळ आजमवण्याचा नारा दिला आहे.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुमला. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम शिवसेनेने जेवढ्या प्रमाणात केले ते कोणताही पक्ष करू शकत नाही. शिवसैनिक जनसेवेसाठी सर्वात पुढे असतो. जात-धर्म न पाहता शिवसैनिक कठीण करताना रक्तदानाला उभा राहतो, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

शिवसेना देशभर पोहचवायची आहे...

आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही, 52 त्यासाठी झगडावे लागले. आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहोत, हे आपल्याला माहित आहे. आता शिवसेना देशभर पोहचवायची आहे, असा कानमंत्र यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

 

मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत...
आपल्याला फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची अशी शपथ मी या मंचावरून घेत आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी कायम तुम्हा सगळ्यांसोबत आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची असेही यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.

 

भाजपने चीटिंग करून पालघर जिंकले..

पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपने चीटिंग करून ‍जिंकली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता समाजकारणाइतकेच राजकारण करणेही गरजेचे झाले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

उद्धव ठाकरे समारोप करणार...

युवा सेनेचे प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमांची सुरुवात झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समारोप करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरची भेट आणि शिवसेनेची आगामी भूमिका याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच भाजपच्या धर्तीवर शिवसेनाही बूथ प्रमुख सक्षम करण्यावर या कार्यक्रमात विशेष लक्ष देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...