आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत दिले आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने घेतलेल्या निर्णयानंतर आता भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

21 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

 

पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने आधीच जाहीर केला आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार असल्याने सत्ताधारी भाजप-शिवसेना युती कायम राहिली पाहिजे, अशी भाजपची इच्छा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेळोवेळी शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

 

...तर शिवसेनेच्या हातात फारसे काही पडणार नाही!
2014 च्या निवडणुकीत भाजपला 123 तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. आणि याच आधारावर 2019 च्या निवडणुकीत जागावाटप झाले तर शिवसेनेच्या हाती फारसे काही पडणार नाही, ही भीती शिवसेनेला सतावते आहे. यामुळे उद्धव ठाकरे हे युतीबाबत साशंक असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...